नाना सिताराम महाजन
मालेगाव,जि.नाशिक :
मोबाईल नंबर- ९९२२९९२६११
………
परिचय-
– शेतकरी कुटुंबात जन्म
– शिक्षण मालेगावातच
– पाचवी सातवीत असल्या पासून वाचन व लेखनाची आवड.
– १९७७- ७८पासून गूढ, भय, विनोदी कथा, कविता, स्फुट लिखाण.
– पुण्यातील मासिक नवल, धनुर्धारी, श्याम सुंदर,सा.सकाळ तसेच सा.लोकप्रभा,मासिक हेर,सा.गावकरी सा.मार्मीक आदींसह देशदूत रामभुमी,रसरंग,चित्ररंग आदी दिवाळी अंकातून साहित्य प्रकाशीत. नियतकालिकातून कथा कविता प्रसिध्द. काही कथा स्पर्धेत यश.
– स्थानिक बँकेचा अल्पठेव प्रतिनिधी म्हणून फिरून पैसे जमा करणे हा पोटार्थी व्यवसाय
– १९८२ पासून दै.सौरचक्र (स्थानीक) मधून पत्रकारितेस प्रारंभ
– १९८३पासून सलग १७ वर्ष लोकमतचे तालुका प्रतिनीधी व मालेगाव कार्यालय प्रमुख,उपसंपादक म्हणून काम
– २००१ पासून दै.गावकरीत उपसंपादक, मालेगाव कार्यालयात प्रमुख म्हणून सेवा.
– २०१२ पासून दीड वर्ष पुण्यनगरीत उपसंपादक, कसमादेना ब्युरोचिफ म्हणून काम
– नंतर मालेगावातून स्वत:चे दै.लोकराष्ट्र टाइम्स हे दैनिक सुरु केलेय.सध्या संस्थापक संपादक(मुलगा मालक,प्रकाशक, संपादक व व्यवस्थापक)
– माय अर्थात आईच्या कविता या अनेक आवृत्या निघत असलेल्या काव्य संग्रहातमहाराष्ट्रातील ख्यातकीर्त जेष्ठ श्रेष्ठांच्या पंगतीत माझ्या माय कवितेला स्थान.मान्यवर समिक्षकांडून त्यांच्या ग्रंथामधून माझ्या काव्याची दखल.
– इतर संपादित काव्यसंग्रहात काव्य प्रकाशित
– सुविख्यात लोक कवी प्रशांत मोरे यांच्या आई एक महाकाव्य अर्थात आईच्या कविता या प्रसिध्द कार्यक्रमा्द्वारे माझ्या माय कवितेचा राज्यभर प्रसार व लाभलेला प्रतिसाद
– मालेगाव साहित्य संघाचा क्रियाशील कायकर्ता.
– सामाजिक व साहित्य उपक्रमांह चळवळीमध्ये अग्रेसर
– साहित्य संमेलनांमध्ये सहभाग
– कविता संग्रह प्रकाशनाची जुळवाजुळव सुरु.
– मान्यवरांच्या हस्ते,उपस्थितितीत साहित्य,समाज कार्य,पत्रकारिता यासंबधी पुरस्कार.
वेगवेगळया क्षेत्रात काम करणारे नाना महाजन पत्रकारिता करतानाही त्यांच्यातला कवी हरवू देत नाही. त्यांच्या कवितेतील भावनिकता बघितल्यावर त्यांच्यातल्या निरागस कवीचे दर्शन होते. सामाजिक,राजकीय आशय व्यक्त करतानाच नात्यांचा पदर ते अलगद उलगडतात. नानांच्या अशाच ‘झेलाबाई माय’ या कवितेचे अक्षरचित्र आपल्यासाठी……
-विष्णू थोरे,चांदवड