भगवान निळे
घबीळ नाका , ठाणे (प)
भ्रमणध्वनी : ९०८२६०२८०९
ईमेल : bhagwannilejii@gmail.com
…….
परिचय –
– कवी, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ता.
– मुंबईहून प्रसिध्द होणाऱ्या दैनिक नवशक्ति या वर्तमानपत्रात वृत्त संपादक म्हणून सेवानिवृत्त.
– गेली ४० वर्षे काव्यलेखन.
– हिंदी , गुजराती , इंग्रजी आणि उर्दू भाषांमधून कविता अनुवादित.
– भारत सरकारतर्फे प्रसिध्द करण्यात आलेल्या वार्षिकी १९९० या विशेषांकात मराठी विभागात कवितेचा समावेश .
– शब्द साहित्य ‘ या दिवाळी अंकाचे संपादन.
– कोकण मराठी साहित्य परिषदेच्या ‘झपूर्झा ‘ या नियतकालिकाचे दोन वर्षे कार्यकारी संपादक म्हणून काम.
– अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या चार संमेलनात निमंत्रित कवी म्हणून सहभाग.
- कोकण मराठी साहित्य परिषदेच्या रौप्यमहोत्सवी संमेलनातील काव्यसंमेलनाचा अध्यक्ष म्हणून सहभाग, तसेच विद्रोही साहित्य संमेलन, अस्मितादर्श मेळावा, काव्यहोत्र यात निमंत्रित कवी व अध्यक्ष म्हणून सहभाग. दूरदर्शन, आकाशवाणीवरून कविता प्रसारित व प्रक्षेपित. अनेक काव्यसंग्रहाना प्रस्तावना.
- प्रकाशित साहित्य • सांगायलाच हवंय असं नाही हा काव्यसंग्रह प्रकाशित.(सृजन प्रकाशन,२०१५ )
(दुसरी आवृत्ती: श्री भैरी भैरवी प्रकाशन, २०१७)
• “एका कवीच्या दुःखाचे भाषांतर” (काव्यनाट्य ) (संवेदना प्रकाशन,२०१७ )
• “तलवारीच्या पात्यावर थरथरणारे फुलपाखरू” (दीर्घ कविता )- (सृजन प्रकाशन, २०१७)
• त्रेसष्ठ (संवेदना प्रकाशन, २०२० )कवी भगवान निळे यांच्या ‘कफल्लक आयुष्याची झडती घेताना’ या कवितेचे अक्षरचित्र आपल्यासाठी..
-विष्णू थोरे,चांदवड