औरंगाबाद
परिचय-
प्रिया धारूरकर या अनेक पुरस्काराने सन्मानित आहेत. त्या एकविसाव्या शतकातील पहिल्या दोन दशकांमधील मराठी कवितेतील स्त्री जाणिवांना समृद्ध करणाऱ्या एक महत्त्वाच्या कवयित्री आहेत. तरल संवेदनांना चिंतनगर्भ आशय प्रदान करणारी त्यांची मांडणी लक्षणीय आहे. अनिवार आणि अलवार प्रेमातील समंजसपणा अंतिमतः माणूस म्हणून ‘स्व’ चा घेतलेला शोध आहे. स्त्री हे अभिव्यक्तीचे स्त्रोत असले तरी त्यापुढे जाऊन मानवीमूल्य प्रस्थापित करणारी त्यांची कविता आहे. निसर्ग आणि समाज यांचा वेध घेत आत्मशोधाची परिक्रमा अखंडपणे करत राहणे हे त्यांच्या काव्यधर्माचे महत्वपूर्ण लक्षण आहे. सुप्त आणि प्रकट मनातील द्वंद्व वस्तुस्थितीला अधोरेखित करणारे असतात. ‘विदेही’ (२००७), ‘अंग भरून वाहणाऱ्या पान्ह्यातून’ (२०१२) हे कविता संग्रह तर ‘घन दाटले स्वर’ (२०१५) हा ललित लेख संग्रहही त्यांच्या नावावर आहे. तीन प्रातिनिधिक हायकू संग्रहात त्याने हायकू व हायकूंचा हिंदी अनुवाद प्रसिद्ध असून स्वामी रामानंद विद्यापीठात पदवी प्रथम वर्ष अभ्यासक्रमात कविता समाविष्ट. त्याच बरोबर कमला नारायण प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या आठशे वर्षातील शंभर कवयित्रींच्या *शततारका* या संग्रहातही त्यांच्या कवितेचा समावेश आहे. त्यांच्या वेळा मावळतीच्या या कवितेचे अक्षरचित्र आपल्यासाठी…
-विष्णू थोरे
छान!