प्रभाकर वसंतराव साळेगावकर (बी. एस्सी., बी. एड., एम. ए. मराठी )
मुख्याध्यापक, महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय, माजलगाव, बीड
……
परिचय –
– ग्रंथसंपदा: वादळ (कविता संग्रह १९९२), हळवे ठसे (हायकू संग्रह २००६), तूच आमची शान (बालकविता संग्रह
२००८)
– ‘पाणीबाणी’ या कवितासंग्रहाचे संपादन. २०१६ साली फक्त पाणी हा विषय घेऊन महाराष्ट्रातील ५० विविध कविंच्या
कवितांचे संपादन केले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मंबई यांचा हा उपक्रम होता. ‘ग्रंथाली प्रकाशन’ने या संग्रहाचे
प्रकाशन केले.
– स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या ‘बी.ए. प्रथम वर्थ मराठी ऐच्छिक ’साठी ‘हायकूं ’चा समावेश
संपादित ग्रंथातील सहभाग:
• मराठवाड्याची आई (संपादन, रामदास केदार)
• मराठी कवितेतील आई (संपादन, दीपाताई क्षीरसागर)
• माय अर्थात आईच्या कविता (संपादन, प्रशांत मोरे)
• छंदात रंगली कविता (संपादन, विसुभाऊ बापट)
• मेहक मराठी हायकू की (संपादन, श्याम खरे)
सन्मान व परस्कार:
• आचार्य अत्रे आद्य विडंबनकार राज्यस्तरीय पुरस्कार (आचार्य अत्रे प्रतिष्ठान, पुणे)
• यशवंत साहित्य गौरव पुरस्कार
• महाराष्ट्र शासनाचा २०१७ चा राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार
• माजलगाव भूषण (मंगलनाथ पतसंस्थेचा पहिला पुरस्कार)
• उत्कृष्ट वाङमय निर्मिती पुरस्कार (नागठाणे, वि. सांगली)
• लोकसंसद पुरस्कार (उमरी, वि. नांदेड)
• सुभद्रा प्रतिष्ठान, सेलू यांचा ‘वाङमय पुरस्कार’
• पत्रकार संघाचा ‘मूकनाय माजलगाव भूषण पुरस्कार’
• हायकू लेखनाचा राज्यस्तरीय पुरस्कार (भोकर वि. नांदेड)
• कै . संतुकराव भोकरे बालसाहित्य सेवा पुरस्कार (अंबाजोगाई)
• शतायुषी प्रकाशनाचा कै. सत्यभामा बिवरे वाङमय पुरस्कार (माजलगाव)
• शेत शिवार पुरस्कार (पेठवशिणी, ता. पालम)
*ठळक नोंदी*
• निवडक हायकुं चे हिंदी व इंग्रजी भाषेत अनुवाद झाले असून त्यांची विश्वकोषात नोंद
• औरंगाबाद, महाबळेश्वर, ठाणे, सासवड येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांमध्ये निमंत्रित कवी
म्हणून सहभाग
• परभणी येथे संपन्न अखिल भारतीय बालकुमार साहित्य संमेलनामध्ये परिसंवादात सहभाग
• जळगाव, परभणी व ठाणे येथे आयोवित प्रतिभासंगम संमेलनांमध्ये निमंत्रीत कवी
• अंबाजोगाई येथील समरसता संमेलनातील परिसंवादासाठी निमंत्रित
• गोवा येथे संपन्न २२ भाषेच्या राष्ट्रीय कवीसंमेलनामध्ये मराठीतील निमंत्रित कवी
• शासनाच्या वतीने आयोजित केल्याजाणाऱ्या अखिल भारतीय त्रैभाषिक कवी संमेलनात अनेकदा सहभाग
• मराठवाडा व इतर साहित्य संमेलनांमध्ये सातत्याने निमंत्रित कवी म्हणून सहभाग
• ईटीव्ही मराठीवरील साहित्य दरबार व हास्यरंगच्या ६२ भागांमध्ये कविता सादरीकरण
• ‘आई’ कविता कोल्हापूर येथील तशवाजी तवद्यापीठाच्या बी.ए. प्रथम विषयाच्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट
• ‘हे राष्ट्रध्वजा’ ही कविता शालेय गीत मंचामध्ये समाविष्ट
• ‘वल्ड रेड सेंटर’वरील हल्ल्यानंतर बनवलेली कविता ‘महाराष्ट्र मंडळ, न्यूयॉर्क अमेरिका’ येथे फलक करून लिहिलेली
आहे
• ‘आकाशवाणी’वरून कथाकथन व काव्यवाचन
• ‘साम टीव्ही’ व ए.बी.पी. माझा वर कवितांचे सादरीकरण
• शेतकरी आधार काव्ययात्रेचे आयोजन
• मराठवाडा साहित्य परिषदेचे आजीव सभासद व १२ वर्ष ‘मसाप’ माजलगाव शाखेचे कार्यवाह म्हणून काम. याच काळात शिवार
‘साहित्य संमेलन’ संकल्पना रुजली व पुढे नेली.
• ४ जानेवारी२०१९ राजी नाथ्रा येथे आयोजित तिसऱ्या मराठी ससाहित्य संमेलनाचे अध्यक्ष
• सांगली जिल्ह्यातील पलूस येथे आयोजित १६ व्या परिवर्तन साहित्य संमेलनाचे अध्यक्ष
• दिंद्रुड येथील चौथ्या शिवार साहित्य संमेलनाचे अध्यक्ष
• माजलगाव मध्ये गेली २५ वर्ष अभिजात संगीत व साहित्य रुजविण्याची चळवळ रसिक मंडळातफे चालिली जाते. या
संस्थेचे कार्यवाहक
• उत्तम निवेदक व व्याख्याते
कवी प्रभाकर साळेगावकर यांच्या ‘ माझे गीत तुझी चाल’ या कवितेचे अक्षरचित्र आपल्यासाठी…
-विष्णू थोरे,चांदवड
Nice composed poem sr