परिचय-
नीलिमा श्रुतिश्रवण प्रतिभासंगमच्या कार्यक्रमात भेटल्या लातूरला. प्रिया धारूरकर,दुर्गेश सोनार आम्ही त्यांच्या घरी पण गेलो. घरात कितीतरी पुस्तकं बघितली. लेखक कवीच्या घरांचा हा एक आकर्षक फिल असतो. वर्तमानपत्रांतून त्यांनी लिहिलेली बरीच पुस्तक परीक्षणे वाचली होती. प्रगल्भ आणि खोल लिखाणाची त्यांची लेखनशैली प्रभावी आहे. चिंतनशील जाणिवेची भावगर्भ कविता नीलिमा श्रुतिश्रवण लिहितात. नीलिमा कुलकर्णी या नावानेच त्या आधी लिहित असत. श्रुतिश्रवण हे वेगळं नाव असल्याने तेच लावत जा म्हणून दुर्गेश सोनार सर व आम्ही सुचवलं. श्रुतिश्रवण हे त्यांचं सासरचं नाव. दरम्यान एका दुर्दैवी घटनेत त्यांचं दुःखद निधन झालं आणि एक चांगली कवयित्री आणि समीक्षक आपल्यातून कायमची निघून गेली.
नीलिमा श्रुतीश्रवण यांच्या ‘मंतरलेलं झाड’ या कवितेचे अक्षरचित्र त्यांच्या आठवणींना सस्नेह..
-विष्णू थोरे,चांदवड