मोबाईल-८०८७१७२२४१
परिचय-
‘ आता पावसा मातीशी लगीन साजरं, गुलमोहराचं कुकु तिच्या भांगामध्ये भर ! ‘या कवितेने महाराष्ट्रभर ओळख निर्माण झाली. याच कवितेचं ‘धोंडी’या सिनेमात गाणं झालं तेही प्रशांतच्याच आवाजात ! ‘बाप मनात जपतो लेक त्याची सोनपरी,तरी जीवाचा जिवडा देतो परक्याच्या घरी’ ही कविता ऐकल्यानंतर रसिकांच्या डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहत नाही.’पाटी पुस्तक दप्तर आहे, शाळा माझी सुंदर आहे ! या बालकवितेने बाल- किशोर रसिकांमध्ये प्रशांत प्रसिद्ध आहे. निसर्गाशी नाते सांगणाऱ्या तरल कविता हे प्रशांत केंदळे यांच्या कवितेचे वैशिष्ट्य माणसाचं सुखदुःख ही त्यांच्या कवितेमध्ये अगदी साध्या सोप्या शब्दांमध्ये येतं आणि प्रशांत गायला लागला की हे शब्द आपोआपच रसिकांचे होतात.
‘गुलमोहराचं कुकू’हा कवितासंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर. ‘नातवांच्या कविता, गाव व्हिलेज झालंय, कवितेची पाऊलवाट’अशा कार्यक्रमातून रसिकांपर्यंत पोहोचला. वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांच्या ‘हास्यधारा’या महाराष्ट्रातील मान्यवर कवींच्या कार्यक्रमात ही वेळोवेळी निमंत्रित ! राज्यभरातील अनेक नियतकालिकात कविता प्रसिध्द.
आपल्या कवितेने अनेक कार्यक्रम गाजवले.
– नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या ‘माध्यमिक विद्यालय, उंटवाडी, सिडको’येथे शिक्षक म्हणून कार्यरत.
– कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या ‘साहित्य भूषण’ परीक्षेत राज्यात प्रथम आल्याबद्दल इंद्रायणी पुरस्कार,कै.समीक्षक चंद्रकांत वर्तक स्मृती पुरस्कार प्राप्त
– पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य कला अकादमी, चिंचवड यांच्या ‘आम्ही नारायण सुर्वे यांचे वारसदार’ हा सन्मान प्राप्त.
– गदिमा महोत्सव,भोसरी यांचा’आम्ही गदिमांचे वारसदार’हा सन्मान प्राप्त.
– इगतपुरी तालुका साहित्य मंडळाचा’काव्यरत्न’पुरस्कार
– लोकमत युवा महोत्सव मुबंई येथे प्रथम पुरस्कार.
– ‘स्वराज्य परिवार’चा आदर्श शिक्षक पुरस्कार.
– शिवसेना नाशिक यांचा’गुणवंत शिक्षक’पुरस्कार.
प्रशांतचा गुलमोहराचं कुंकू या कवितेचे अक्षरचित्र खास आपल्यासाठी…
-विष्णू थोरे,चांदवड
व्वा बहुतही ब ढी या
Great sir
सदैव कविवर्या,
पुढेच जायचे!
– मनःपूर्वक सदिच्छा, प्रशांत!
खूप खूप खूप सुंदर!!!????????
सुंदर
Nice Poem ????????
खूप छान????????
खूप छान प्रशांत ????????????????
KHUPACH CHAN…GREAT WORK PRASHANT????????…WISHING YOU THE BEST LUCK ALWAYS ????????