डॉ.एस.के.पाटील
गाव- दाभाडी,तालुका -मालेगाव.
मोबाईल नंबर-९८५०१९३५३५
…..
परिचय-
डॉ.सखाराम पाटील यांना सर्व प्रेमाने एसके बापू म्हणतात. “अहिराणी वैभव” या एकपात्री कवितेच्या कार्यक्रमाचे जवळ जवळ १४०० प्रयोग त्यांनी खान्देशात केले आहेत.खानदेश रत्न हा मानाचा पुरस्कारही त्यांना मिळाला आहे.त्याच बरोबर कसमादेचा ‘साहित्य भूषण’ हा पुरस्कारही त्यांना मिळाला आहे.मालेगाव ग्रामीण साहित्य संमेलनाचे डॉ.पाटील संस्थापक अध्यक्ष आहेत.
कमला, दुर्वा, माझे मन तुझे झाले या मालिकांसाठी त्यांनी शीर्षक गिते लिहिली असून
‘तुह्या धर्म कोंचा’ या अहिराणी चित्रपटा साठी गीत लेखन देखील केले आहे. या चित्रपटातील त्यांनी लिहिलेल्या गीताला २०१५ चा नॅशनल अवॉर्ड गायिका बेला शेंडे यांना मिळाला होता. अहिराणी कवितेतलं डॉ. एस.के.पाटील हे ठळक नाव आहे, त्यांच्या ‘मुलगी रांगोळी काढत बसते’या कवितेचे अक्षरचित्र खास आपल्यासाठी…
–विष्णू थोरे,चांदवड
“मुलगी रांगोळी काढत बसते” सुंदर कलाकृती आहे ही एस के बापूंची! फार मोठा लाक्षणिक अर्थ असलेली ही रचना म्हणजे सुंदर अक्षरशिल्प आहे! एस के बापू ..सलाम आपल्या या प्रतिभेला !!!
बापू बहुतही ब ढी या