डॉ . प्रदीप आवटे, पुणे
मोबाईल – ९ ४२३ ३३ ७५५६
ई – मेल – dr.pradip awate@gmail.com
…..
परिचय –
साहित्यिक कामगिरी
• कविता , गीत , कथा आणि नाटयलेखन प्रकाशित पुस्तके
• कविता संग्रह ‘ माझ्या आभाळाची गोष्ट ‘ ( १ ९९ ८ ), या अनाम शहरात ‘ ( २०१७ )
‘ धम्मधारा ‘ ( बौध्द तत्वज्ञानावरील काव्यग्रंथ ) -२०१२
• किशोर कथा संग्रह / किशोर कादंबरी ‘ जग्गुभैय्या झिंदाबाद ‘ ( २००४ )
‘ जादू की झप्पी ‘ ( २०१८ )
आणखी एक स्वल्पविराम – किशोर कादंबरी ( २०१८ )
अडीच अक्षरांची गोष्ट ‘ हा उदात्त प्रेमाची महती सांगणारा ललित लेख संग्रह ( २०१८ )
• नवा भूगोल घडवू ‘ आणि सेंट परसेंट आजचे न्यायालय ‘ या बालनाटिकांचे लेखन
• कालदर्शी -अरुण साधूंवरील समीक्षात्मक पुस्तकाचे सहलेखन स्तंभलेखन .
• जीवनगाणे ‘ ब्लॉग लेखन http://dr-pradip.blogspot.com
• ‘ अडीच अक्षरांची गोष्ट ‘ ( अपवादात्मक प्रेमासंदर्भात ललित सदर ) – दैनिक दिव्य मराठी रसिक रविवार पुरवणी
• कॉलेज कॅटीनमधून ( विनोदी सदर ) – दैनिक तरुण भारत -सोलापूर
• वाटा आरोग्याच्या ( आरोग्य विषयक सदर ) . मुंबई सकाळ
• आरोग्य भान ( आरोग्य विषयक सदर ) , साप्ताहिक लोकप्रभा
• अर्धी भेट ( पत्रात्मक सदर ) , दैनिक तरुण भारत –सोलापूर
• बालांचे आरोग्य ( आरोग्य विषयक सदर ) साप्ताहिक गांवकरी इतर
• धम्मधारा ही ऑडिओ सी डी प्रकाशित – संगीतकार रोहित नागभिडे
• ‘ पाखरांची शाळा ‘ या मुलांसाठीच्या मासिकाचे संपादन
• बालनाटय , कविता , मुलाखती , श्रुतिका यांच्यासह आकाशवाणीवरुन विविध कार्यक्रमांचे प्रसारण दूदर्शनवरील विविध कार्यक्रमात सहभाग , आरोग्य विषयक मुलाखती
• ‘ फॅण्ड्री ‘ या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटात छोटीशी भूमिका काही उल्लेखनीय-
• २०१८ मध्ये इयत्ता दहावीच्या ( इंग्रजी माध्यम ) मराठीच्या पाठयपुस्तकात ‘ अक्षरभारती ‘ मध्ये फूटप्रिन्टस् ‘ या कुमारकथेचा समावेश
• या अनाम शहरात या काव्यसंग्रहाचा स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ , नांदेडच्या एम ए मराठी अभ्यासक्रमात समावेश
• मराठी कविता का समकाल ‘ या प्रकाश भातंब्रेकर हिंदी काव्यग्रंथात ‘ झाड ‘ या कवितेचा समावेश
• ‘ माझ्या आभाळाची गोष्ट ‘ या कविता संग्रहाला साहित्य कलायात्रीचा जगदीश खेबूडकर पुरस्कार गीत लेखनासाठी सामाजिक वनीकरण खात्याचा पुरस्कार
• ‘ नवा भूगोल घडवू ‘ आणि • सेंट परसेंट आजचे न्यायालय ‘ या बालनाटिकांना वनराई राज्य स्तरीय नाट्य स्पर्धेत सर्वोत्कृष्ट लेखनाचा पुरस्कार तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळांचापुरस्कार या दोन्ही नाटिका आकाशवाणीवरुन प्रसारित
• उत्कृष्ट ग्रामीण आरोग्य सेवेबद्दल महाराष्ट्र शासनाचे मानपत्र १ ९९ ७
• वैद्यकीय आणि साहित्य सेवेबद्दल गांधी फोरम सोलापूर येथील रंगा वैद्य स्मृती पुरस्कार वैयक्तिक माहिती
• व्यवसायाने डॉक्टर – ( एमबीब एस, डीसीएच )
• सध्या महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य सेवेत ‘ राज्य सर्वेक्षण अधिकारी ‘ म्हणून कार्यरत .
• इंग्रजी साहित्यात एमए , तसेच सुवर्णपदकासह पत्रकारितेतील पदवी ( बीएमसीजे )
• जागतिक आरोग्य संघटनेच्या पोलिओ निर्मूलन कार्यक्रमात ‘ सर्वेक्षण अधिकारी ‘ म्हणून उत्तर प्रदेश , गुजरात , मध्य प्रदेश मध्ये कार्य .
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य साथ रोग सर्वेक्षण अधिकारी म्हणूनही डॉ. प्रदीप आवटे यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे ,बजावत आहेत. एक कवी मनाचा वैद्यकीय अधिकारी किती सर्जनशील,संवेदनशील आणि ताकतीने लिहितो याचा प्रत्यय त्यांच्या कविता वाचताना येतो. त्यांच्या ‘या अनाम शहरात’ या काव्यसंग्रहातील एका कवितेचे अक्षरचित्र आपल्यासाठी….
-विष्णू थोरे,चांदवड