डी. के. शेख , उस्मानाबाद .
मोबाईल -९५५२८४३३६५
…..
परिचय-
– डी.के.शेख हे मराठी आणि दखनी भाषेतून काव्यलेखन करणारे मराठवाड्यातीलउस्मानाबाद येथील कवी आहेत.प्रौढ कवितेसोबतच मराठी आणि दखनी भाषेतून बालकविता लिहिल्या आहेत .बालकथा, ललितलेख,तसेच लावण्या आणि गाणीही त्यांनी लिहली असून अनेक गाणी संगीतबद्ध झालेली आहेत.” दंगल आणि इतर कविता” हा त्यांचा लक्षवेधी कवितासंग्रह असूनया संग्रहास अनेक पुरस्कार मिळाले आहेत. विद्यापीठीय अभ्यासक्रमातून त्यांच्या कवितांचा समावेश झालेला आहे. “दंगल आणि इतर कविता”या संग्रहाचा उर्दू अनुवाद प्रकाशित झाला असून हिंदी अनुवाद प्रकाशनाच्या मार्गावर आहे. सोबतच मंचीय कवितेसाठीही ते प्रसिद्ध आहेत. अ.भा.मराठी साहित्य संमेलन पंजाब- घुमान व उस्मानाबाद , राष्ट्रीय कविसंमेलन काव्यहोत्र -गोवा ,जागतिक मराठी अकादमी संमेलन-मुंबई,अ.भा.मुस्लिम मराठी साहित्य संमेलन -जळगांव (कविसंमेलन अध्यक्ष), पुणे फेस्टिवल,राज्यस्तरीय कविसंमेलने,त्रैभाषिक कविसंमेलने व मुशायरे त्यांनी गाजवले आहेत . कवी डी.के शेख यांची ‘राजकारण करतोस काय?’ ही कविता महराष्ट्रात प्रसिद्ध आहे. ती कविता त्यांच्या तोंडून ऐकायला मजा येते. एक साधा आणि सोज्वळ असा हा कवी मित्र आहे .त्यांच्या ‘माणसागत वागणाराचं’ या कवितेचं अक्षरचित्र खास आपल्यासाठी…
– विष्णू थोरे,चांदवड