जयदीप एकनाथ विघ्ने
देऊळगाव राजा, जिल्हा – बुलढाणा
मोबाईल :- ७९७२४४९६९१
….
परिचय
प्रकाशित पुस्तक:- रुईची फुले
प्राप्त पुरस्कार :-
- स्व. नाना बेरगुडे गझलयात्री पुरस्कार
- – २०१८, गझलउन्मेष पुरस्कार २०१९,
- – गावगाडा पुरस्कार २०२०
- जयदीप विघ्ने हे व्यवसायाने शिक्षक असून मराठी गजलेत त्यांचे मोठे नाव आहे. कविता सादरकरण्याची त्यांची वेगळीशैली आणि प्रभावी सादरीकरण कौतुकास्पद आहे. कथा लेखनात ही ताकदीच्या मराठी ग्रामीण कथा जयदीप विघ्ने लिहितात. त्यांचा “भोंगळा पाऊस” हा ग्रामीण भावविश्व जिवंत करणारा दर्जेदार कथांचा संग्रह लवकरच प्रकाशीत होणार आहे. पहिल्याच भेटीत चांगला मित्र होणारा जयदीप विघ्ने नात्यांच्या ,जीवनाच्या अनेक अंगांनी कवितेतून व्यक्त होतो, त्यांच्या ‘काच नात्यांची’ या गजलचे अक्षरचित्र खास आपल्यासाठी…
-विष्णू थोरे,चांदवड