किशोर भगवान काळे, किन्ही,जामनेर, जळगाव
मोबाईल- ९८९०७ ०४०७९
……
परिचय-
अजिंठा डोंगराच्या पायथ्याशी बुलढाणा, जालना व औरंगाबाद या तीन जिल्ह्याच्या सिमेवर किन्ही ता . जामनेर जिल्हा – जळगाव येथे शेतकरी कुटुंबात जन्म झालेले कवी किशोर काळे हे ग्रामीण व्यथा,वेदना मांडणारे अलीकडील महत्वाचे कवी आहेत. त्यांचा ‘बांडा हंगाम’ हा काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला आहे. शेतक्यांची व्यथा, वेदना मांडताना त्यांची कविता धारदार होते, व्यवस्थेवर परखड भाष्य करते. खान्देशातील शेतकऱ्यांचे वेगळं जगणं अधोरेखित करणारी ‘बांडा हंगाम’ मधील कविता सशक्त व ताकतीची आहे. मंचर येथील शांता शेळके प्रतिष्ठाणचा ‘साहित्य गौरव पुरस्कार’ ही या संग्रहाला मिळाला आहे. ग्रामीण कवितेचा अभ्यास करताना किशोर काळे यांची कविता दुर्लक्षित करून चालणार नाही. कवी ना.धों.महानोर यांच्या नंतर लिहू लागलेली ही पिढी आहे.महानोरांची कविता लोकलयी मुळे रसिकांच्या मनात रुंजी घालत राहिली. निसर्गाशी नातं सांगत राहिली. पण याच प्रदेशातील शेतकऱ्याच्या वाट्याला येणारे दुःख ,दैन्य मांडण्याचा प्रयत्न नव्या पिढीने केला. किशोर काळे या पिढीचे शिलेदार आहेत.
किशोर काळे यांच्या ‘दूधखुळा नसतो कोणी’ या कवितेचे अक्षरचित्र आपल्या साठी…
-विष्णू थोरे,चांदवड