विजयकुमार मिठे
नाशिक जिल्ह्यातील पालखेड बंधारा येथे वास्तव्य, व्यवसाय शेती.कथा,एकांकीका,कविता,
व्यक्तिचित्रे,कादंबरी अशा विविध वाङमय प्रकारात लेखन. “घोंगटयाकोर” “कादवेचा राणा ” “बुजगावणं ” “हेळसांड” हे कथासंग्रह.”गावाकडची माणसं” “माझी माणसं” हे व्यक्तिचित्र संग्रह. “लेखणी उडाली आकाशी” “आम्ही साक्षर श्रीमंत” हे एकांकीकासंग्रह. “आभाळओल”,”चांदणभूल”हे ललितलेख संग्रह.”ओल तुटता तुटेना”,”हिर्वी बोली “हे काव्यसंग्रह प्रकाशित आहेत. शंकर पाटील कथा पुरस्कार, अण्णा भाऊ साठे कथा पुरस्कार, नारायण सुर्वे कथा पुरस्कार, कुसुमाग्रज काव्य पुरस्कार इत्यादी राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानीत आहेत. ओघवती भाषा, देखणी शब्दकळा हे त्यांचे लेखन वैशिष्ट्ये आहे.आठवणीतील गावगाडा आणि बदलता गावगाडा त्यांनी नेमकेपणाने टिपला आहे. बदलत्या कृषि जीवनाचे वास्तव चित्रण त्यांच्या कवितेतून दिसते. त्यांच्या लेखनाला कादवा शिवाराचा गंध आहे.
- विष्णू थोरे
धीर देणारी रचना
रचना अप्रतिम.
चित्रकाव्यही अप्रतिम.
कवी विजयकुमार मिठे आणि चित्रकार विष्णू थोरे यांचेही अभिनंदन…!