आनंद पेंढारकर, डोंबिवली
९३२०२०३२१२
…….
परिचय-
– कोमसाप, डोंबिवली शाखेचे विद्यमान अध्यक्ष आणि काव्यरसिक मंडळ, डोंबिवलीचे माजी अध्यक्ष
– डोंबिवली येथील ९०व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या संमेलन गीताचं लेखन
– उस्मानाबाद येथे झालेल्या ९३ व्या मराठी साहित्य संमेलनात निमंत्रितांच्या कविसंमेलनात सहभाग
– २०१६ सालच्या तरन्नुम साठी देण्यात येणाऱ्या “गजलगुंजन” पुरस्काराने सन्मानित
- “पंखांची सावली” या ई-टीव्ही मराठीवरील मालिकेच्या शीर्षकगीताचं लेखन
- ओंजळीतून मनाच्या” या अल्बमसाठी गीतलेखन ……
प्रकाशित साहित्य :
– काव्यसंग्रह “या शहरातून”
– गजलसंग्रह “उरीचे श्वास”
– इ-बुक “सुरुवातीच्या कविता”सादर करत असलेले कार्यक्रम :
– स्वलिखित कवितांचा कार्यक्रम “कवितेचं बेट”
– स्वत: लिहिलेल्या, संगीतबद्ध आणि गायन केलेल्या मराठी गीतांचा कार्यक्रम “तुझ्याचसाठी”
– स्वतः लिहिलेल्या आणि गजलगायक विनायक लळीत यांनी संगीतबद्ध केलेल्या गजलगायनाचा कार्यक्रम “उरीचे श्वास”
– अनेक काव्यस्पर्धांमध्ये व गायनस्पर्धांमध्ये सहभाग व पारितोषिकं अनेक कविसंमेलनं, मुशायरे यात सहभाग.विविध वाद्यवृन्दातून १५० पेक्षा जास्त कार्यक्रमात गायन केलं. ताक धिना धिन, सारेसारे गाऊया, तारारंपम, रामबंधू अंताक्षरी या दूरदर्शनवरच्या कार्यक्रमात सहभाग
आनंद पेंढारकर यांच्या ‘उंबऱ्यात क्षितीजाच्या’ या कवितेचे अक्षरचित्र आपल्यासाठी…
-विष्णू थोरे,चांदवड