परिचय-
अहमदनगर जिल्हातल्या छोट्या खेड्यात हनुमान टाकळीत अनिल कोठे यांचे बालपण आणि प्राथमिक शिक्षण झाले आहे. ते इलेक्ट्रॉनिक्स इंजीनियर असून उद्योजक म्हणून पुण्यात वास्तव्य करतात. गेली ३५ वर्षे पुण्यात उद्योग आणि सामाजिक क्षेत्रात त्यांचे मोठे काम आहे. कविता, लेखण, वाचनाची त्यांना आवड आहे. कवितेच्या माध्यमातून खुप मित्र परीवार त्यांनी जोडला आहे.
काही माणसं खूप प्रेम करतात कवींवर आणि त्यांच्या कवितांवर. त्यापैकीच कवी अनिल कोठे सर..पुण्यात बालगंधर्व नाट्यगृहात आमचा कार्यक्रम होता आणि सोबत कवी कृपेश महाजन ही होता. त्यावेळी अनिल कोठे सर भेटायला आले…एवढा मोठा व्यावसायिक व्याप आपले सर्व सोडून आम्हाला भेटायला आले. कृपेशला वाद्य वादनाची आवड आहे आणि ते केवळ सोशल मीडियावरून जाणून त्याच्यासाठी हार्मोनिका भेट आणली आणि आमच्या कवितांच्या मैफिलीआधी आमची गाण्यांची मैफिल सुरेल झाली…अर्थात कोठे सरांना कुठलाही अभिनिवेश नाही.त्यांचं जगणं हीच त्यांची कविता आहे.”बोले तैसा चाले” असं दिसलं की आपोआप पाय वंदनीय होतात त्यापैकीच हा एक अवलिया माणूस!…
त्यांची ‘बायका बोलतात’ या कवितेचे अक्षरचित्र आपल्यासाठी…
-विष्णू थोरे,चांदवड