अध्यक्षस्थानावरून बोलताना राजेंद्र उगले म्हणाले, आशेचा किरण आणि अक्षरांसह उगवणं या ठिकाणी जमून आलं आहे. अक्षर चळवळ पुढे नेण्यासाठी ती समाज आणि गावाशी जोडावी लागते आणि ते काम अक्षरबंध करीत आहे. ही चळवळ गावागावांतील शाळांपासून सुरू व्हावी. अशीही अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
जिल्हा परिषद सदस्य यतिन कदम म्हणाले की, प्रत्येकाचे आयुष्य संघर्षातूनच उभे राहते. त्यातही तरुन जाण्याचे बळ पुस्तके देतात. देवाप्रमाणे पुस्तकांची आठवण आपल्याला दुःखात होते आणि ती दिशादर्शक ठरते. अक्षरबंधच्या साहित्य चळवळीला आम्ही सदैव पाठबळ देऊ, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. युवा नेते तुकाराम जोंधळे यांनी त्यांच्या जडणघडणीत अक्षरबंधचा महत्त्वाचा वाटा असल्याचे नमूद करून गावाची सांस्कृतिक ओळख निर्माण व्हावी यासाठी ग्रामपंचायत या चळवळीत नेहमीच योगदान देईल. तसेच येत्या काळात गावात सुसज्ज वाचनालय उभारण्याची मनोकामना व्यक्त केली. जऊळके दिंडोरीचे उपसरपंच मधुकर केदारे यांनी मनोगतातून वाचनाचे महत्त्व विषद केले.
यावेळी लेखिका सीमा महाबळ, अभिनेत अरुण इंगळे, दीपक शहाणे, दत्तात्रेय बैरागी, प्रा. मेघना वाघ, प्रा. प्रियंका कुंदे, कवी प्रशांत धिवंदे, चित्रकार भा.वा.जाधव, प्रीती तिडके, गणेश तिडके, कांचन रहाणे, पत्रकार संदीप गुंजाळ, समाधान पाटील, सुनील भुमरे, बाळकृष्ण काकड, स्नेहल गाडगे, अनिल आहेर, अशोक जोंधळे, सोमनाथ बोरस्ते, भाऊसाहेब जोंधळे, विश्वनाथ जोंधळे, सोमनाथ चौधरी आदींची उपस्थिती होती.
ग्रंथ व रोपे भेट
अक्षरबंधने नेहमीप्रमाणे वेगळेपण जपताना मुखपृष्ठावर साकारलेल्या छायाचित्राची प्रतिकृती तयार करत आणि पारंपरिक दीपप्रज्वलनाऐवजी पणत्या प्रज्वलीत केल्या. कोरोनाच्या या काळात नैराश्याचे मळभ दूर होऊन आनंदाचा सुगंध आयुष्यात दरवळावा म्हणून फुलांनी सजलेल्या टोपलीतून दिवाळी अंक काढून मान्यवरांनी आगळ्यावेगळ्या पद्धतीने प्रकाशन केले. मान्यवरांचा सत्कार करताना पारिजातकाची रोपे आणि ग्रंथ भेट देण्यात आले.
चांगल्या पुस्तकांना पुरस्कार
अक्षरबंध चळवळीच्या माध्यमातून साहित्यविश्वात येणाऱ्या चांगल्या पुस्तकांना पुरस्कार सुरू करावेत म्हणून तळेगाव (ता. दिंडोरी) येथील सेवानिवृत्त अधीक्षक डी. के. चौधरी यांनी २५ हजारांचा, तर पतीच्या स्मरणार्थ मुंबई येथील प्राथमिक शिक्षिका सरोजिनी देवरे यांनी २० हजार रुपयांचा धनादेश यावेळी आयोजकांकडे सुपूर्द केला.