मुंबई – अभिनेता अक्षय कुमारचा आगामी चित्रपट ‘लक्ष्मी बॉम्ब’च्या प्रदर्शनाची उत्सुकता अखेरीस संपली आहे. याबाबत अक्षय कुमारने ट्विटरच्या माध्यमातून अधिकृत घोषणा केली आहे. यंदाच्या दिवाळीत ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्तपट प्रदर्शित होणार असल्याचे अक्षयने स्पष्ट केले आहे. चित्रपटांमधील आगळ्या वेगळ्या प्रयोगांसाठी अक्षय कुमार नेहमीच चर्चेत असतो. आता आगामी लक्ष्मी बॉम्ब या चित्रपटाची देखील अशीच काहीशी चर्चा सध्या बॉलिवुडमध्ये सुरु आहे. कोरोनामुळे या चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर पडत असल्याने अखेरीस चाहत्यांमधील संभ्रम दूर झाला आहे. बुधवारी त्याने ट्वीटरद्वारे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. सोबतच त्याने लहानसा टीझर देखील प्रसिद्ध केला आहे. दिवाळीत म्हणजे ९ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार असल्याचे माहिती अक्षयने दिली आहे.ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणाऱ्या सात चित्रपटांपैकी एक मोठा चित्रपट म्हणून ‘लक्ष्मी बॉम्ब’ची घोषणा झाली होती. ‘या दिवाळीला तुमच्या घरी ‘लक्ष्मी’ सोबत धमाकेदार ‘बॉम्ब ‘ देखील येणार आहे’ अशी पोस्ट त्याने ट्विटरवर शेअर केली आहे.