मुंबई – अंमली पदार्थ प्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी)ने अभिनेत्री दीपिका पदुकोण हिच्यासह श्रद्धा कपूर, सारा अली खान, रकुल प्रीत सिंह आणि सिमोन खंबाटा यांच्यासह एकूण ७ जणांना समन्स बजावले आहे. आगामी ३ दिवसात त्यांना जबाब द्यावा लागणार आहे. त्यासाठी त्यांना एनसीबीसमोर हजर रहावे लागणार आहे. या समन्समुळे बॉलिवुडमध्ये खळबळ माजली आहे. पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात सेलिब्रेटींना एकाचवेळी समन्स बजावण्यात आले असून त्यांची चौकशी होणार आहे.
दरम्यान, खंबाटा आणि सिंग हे दोन्ही गुरुवारीच एनसीबीच्या कार्यालयात हजर होण्याची चिन्हे आहेत. दीपिका मुंबईत नसल्याने तिची चौकशी शुक्रवारी होण्याची शक्यता आहे.