मुंबई – मुकेश अंबानीच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली गाडी आढळल्याच्या प्रकरणात एनआयएने मुंबई पोलीस मधील सहायक पोलीस निरीक्षक (एपीआय) सचिन वाझेला अटक केली. त्यानंतर कोर्टाने वाझेना २५ तारखेपर्यंत एनआयए कोठडी सुनावण्यात आली आहे. एनआयएने १४ दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. पण, कोर्टाने दहा दिवसाची कोठडी दिली आहे.
सचिन वाझे शनिवारी जबाब नोंदणीसाठी एनआयएच्या कार्यालयात पोहोचले होते. लांबलचक चाललेल्या चौकशीनंतर सचिन वाझेला अटक करण्यात आली. त्यानंतर ही कोठडी सुनावण्यात आली. यापूर्वी मनसुख हिरेन प्रकरणात सचिन वाझेचा अटकपूर्व जामीन ठाणे सत्र न्यायालयाने फेटाळून लावला होता.
मुकेश अंबानी यांच्या घरापुढे स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पियो आढळल्याच्या प्रकरणाची एएनआय चौकशी करीत आहे. शनिवारी सकाळी ११ वाजता वाझेची चौकशी सुरू झाली. मनसूख हिरेनसोबत कसा परिचय होता, त्याच्या स्कॉर्पियोचा वापर, स्कॉर्पियो चोरी झाल्यानंतर मुकेश अंबानीच्या घराबाहेर सापडणे आदींबाबत वाझेवर प्रश्नांची सरबत्ती झाल्याचे कळते. या चौकशीत वाझेच्या विरोधात भक्कम पुरावे एएनआयच्या हाती लागले आहेत. न्यायालयाने तर वाझेची चौकशी व्हायला हवी असे म्हटलेच होते, शिवाय विरोधीपक्षानेही विधानसभेत वाझेच्या अटकेची मागणी केली होती. त्यामुळेच वाझेने न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी याचिका दाखल केली होती.