नांदगाव -महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सचिव डॉ.ठकसेन गोराने यांनी नांदगाव अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकारिणीची नुकतीच निवड केली. या कार्यकारणीत नांदगाव शहराध्यक्षपदी प्रा.सुरेश नारायणे, उपाध्यक्षपदी देवीदास मोरे, कार्याध्यक्षपदी भगिरथ रमेश जेजुरकर, कायदेविषयक सल्लागार म्हणून अँड.सचिन साळवे तर कार्यवाह मंडळात प्रधान सचिव मारुती जगधने,तर प्रशिक्षण विभाग कार्यवाह रविराज बोरसे, विविध उपक्रम कार्यवाह दत्तोपंत इप्पर तर बुवाबाजी संघर्ष कार्यवाह म्हणून अशोक कदम यांची निवड करण्यात आली. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सचिव डॉ.ठकसेन गोराणे यांनी सर्व नुतन पदाधिका-यांचे अभिनंदन केले.