नाशिक – अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांचा वनवास संपविण्यासाठी विद्यार्थी अनोखे आंदोलन आज (५ ऑगस्ट) करणार आहेत. सर्व शाखेतील शेवटच्या वर्षातील विद्यार्थी सकाळी ११ वाजता काॅलेजरोड येथील पोस्ट ऑफिस येथे जमणार आहेत. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ते पत्र पाठवणार आहेत. अयोध्येत आज राम मंदिराचे भूमीपूजन सोहळा होत असल्याने याच निमित्ताने विद्यार्थीहिताची सदबुद्धी प्रभू श्रीरामाने मोदींना द्यावी, अशा आशयाचे पत्र मोदी यांना पाठविले जाणार आहे. तशी प्रार्थनाही यावेळी केली जाणार आहे.