नवी दिल्ली – अंतिम वर्षाच्या परिक्षा घेण्यासाठी विद्यापीठ अनुयादन आयोग (युजीसी) आग्रही आहे. त्यामुळेच जर परीक्षा नाही तर पदवी नाही, अशी भूमिका युजीसीने सर्वोच्च न्यायालयात मांडली आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी झाली. त्यावेळी युजीसीने हे स्पष्ट केले आहे की, कायद्यानुसार परीक्षा घेतल्याशिवाय विद्यार्थ्याला पदवी देता येत नाही. सध्या कोरोनाचे संकट असल्याने परीक्षा घेण्यासंदर्भात अनेक राज्य सरकारांनी असमर्थता दर्शविली आहे. प्रकरण न्यायालयात असले तरी विद्यार्थ्यांनी परीक्षेची तयारी ठेवावी, असे युजीसीने स्पष्ट केले आहे. महाराष्ट्र व दिल्ली सरकारला त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी न्यायालयाने वेळ वाढवून दिला आहे.