नाशिक – संरक्षित क्षेत्र असलेल्या अंजनेरी येथे रस्त्याचा घाट घालणाऱ्यांना पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी चांगलीच चपराक दिली आहे. रस्त्याचा प्रस्ताव यापूर्वी तीनवेळा आला आहे. मात्र, हा रस्ता केला जाणार नाही, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. तसे ट्वीट त्यांनी केले आहे. त्यामुळे नाशकात विविध संघटनांनी उभारलेल्या लढ्याला यश आले आहे. तसेच, या निर्णयामुळे महाविकास आघाडी ही पर्यावरणाची अधिक काळजी करीत असल्याचा संदेशही राज्यभरात गेला आहे.
मंत्री आदित्य ठाकरे यांनी केलेले ट्वीट