नाशिक – शहरातील गणेश भक्तांचे श्रद्धेचे ठिकाण असलेले नवश्या गणपती मंदिर आजच्या अंगारकी चतुर्थीच्या दिवशी बंद राहणार आहे. आज अंगारकी चतुर्थी असल्याने भक्तांची प्रचंड गर्दी होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वत्र वाढत आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी एकाच ठिकाणी गर्दी करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून नवश्या गणपती मंदिरात होणारी गर्दी होऊ नये यासाठीच मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे गणेश भक्तांमध्ये काहीशी नाराजी आहे. मात्र, भक्तांच्या आरोग्य हितासाठीच हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. इतर दिवशी नेहमीप्रमाणे मंदिर सुरू राहणार असल्याचे केवळ आजच्या दिवशी म्हणजेच अंगारकी चतुर्थीलाच मंदिर बंद राहणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.