नाशिक – कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात मिशन झिरो नाशिक हे अभियान सुरू करण्यात आली आहे. त्याद्वारे अँटीजेन चाचणी केली जाते. अवघ्या १० मिनिटात कोरोना तपासणी करुन निकाल मिळत असल्याने नाशिककर त्यास प्राधान्य देत आहेत. गेल्या ५० दिवसात ६१ हजारापेक्षा अधिक जणांनी अँटीजेन चाचणी करुन घेतली आहे. याच अभियानाअंतर्गत शहरात विविध ठिकाणी अँटीजेन चाचणी केंद्र कायमस्वरुपी सुरू करण्यात आली आहेत.