नाशिक – शहर परिसरात ठिकठिकाणी केली जाणारी अँटीजेन चाचणी आता केवळ महापालिका रुग्णालयातच केली जाण्याची शक्यता आहे. अँटीजेन टेस्ट कीटची अनुपलब्धता असल्याने महापालिका हा निर्णय घेणार असल्याचे सांगितले जात आहे. या चाचणीद्वारे संशयितांना हुडकून काढण्यात मोठी मदत होत आहे. नवे कोरोना बाधित सापडलेल्या परिसरात ही चाचणी केली जात असल्याने तेथील संशयितांना शोधून काढणे तसेच त्यांच्यावर उपचार करण्याची कार्यवाही केली जाते. तसेच, अवघ्या १० मिनिटात या चाचणीचा अहवाल येत असल्याने नागरिकांचे कोरोना टेन्शन दूर होत आहे. मात्र, आता ही चाचणी महापालिकेच्या रुग्णालयांमध्येच केली गेल्यास नागरिकांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागण्याची चिन्हे आहेत.