नवी दिल्ली – कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता बहुतांश जण घरून काम करत आहेत. तसेच शाळा, महाविद्यालये देखील ऑनलाईन सुरु आहेत. अशा परिस्थिती स्मार्टफोन आणि लॅपटॉपच्या मागणीत वाढ झाली आहे. २५ हजारपेक्षा कमी किमतीच्या लॅपटॉपचा घेतलेला आढावा…
ASUS VivoBook 15
टेक कंपनी असूस भारतातील बजेट सेगमेंटमध्ये सर्वोत्कृष्ट लॅपटॉप ऑफर करत आहे. Asus VivoBook 15 Asus चा सर्वोत्तम बजेट सेगमेंट लॅपटॉप आहे. या लॅपटॉपमध्ये १५.६ इंचाची स्क्रीन असून त्यात इंटेल सेलेरॉन एन ३३५० प्रोसेसर आहे. लॅपटॉपमध्ये ४ जीबी रॅम आणि १ टीबी स्टोरेज सुविधा आहे. विंडोज १० च्या सुविधेसह लॅपटॉप काम करतो. ६ तासांपर्यंत बॅटरीबॅकअप यात समाविष्ट आहे. २४ हजार ९९० रुपयांना हा लॅपटॉप उपलब्ध आहे. जर अँमेझॉनद्वारे विकत घेतले तर अॅक्सिस बँक, आयसीआयसीआय किंवा सिटीबँकच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डद्वारे १५०० रुपयांची अतिरिक्त सूट दिली जात आहे.
Acer One 14
एसरचा हा लॅपटॉप खूप प्रसिद्ध आहे, या लॅपटॉपमध्ये १४ इंचाचा स्क्रीन आहे. ४ जीबी रॅम आणि १ टीबी स्टोरेजची सुविधा यात आहे. हा लॅपटॉप इंटेल पेंटियम ड्युअल कोर प्रोसेसरसह आहे. लॅपटॉपमध्ये विंडोज १० असून इंटेल इंटिग्रेटेड एचडी ६१० ग्राफिक्स कार्ड देखील आहे. लॅपटॉपचे साधारण वजन १.८ किलो आहे. यात ७ तासांपर्यंत बॅटरी बॅकअप आहे. टिकू शकेल असे कंपनीचे म्हणणे आहे. हा लॅपटॉप २१ हजार ९९० रुपयांचा आहे. कोटक महिंद्रा बँक आणि एचडीएफसी बँकेच्या कार्डद्वारे १५०० रुपयांची अतिरिक्त सूट दिली जात आहे.
Lenovo Ideapad 3
२५ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत हा सर्वोत्कृष्ट लॅपटॉप आहे. लेनोवो इडियापॅड ३ फ्लिपकार्टवर २४ हजार ३४७ रुपयांना उपलब्ध आहे. कोटक आणि एचडीएफसी बँक कार्डद्वारे पैसे दिल्यास १५०० रुपयांची अतिरिक्त सूट देण्यात येत आहे.