संस्कारमाला – भाग पहिला.. -सावित्री व्रत
मंगळवार– कथानकावरील प्रश्न
बालमित्रांनो ,आता माझ्या काही प्रश्नांची उत्तरे द्या पाहू.
१) श्यामचे वडील कोणत्या गावी गेले होते ?
२) श्यामचे वडील काय कारभार पाहत असत ?
३) श्यामच्या आईने कोणते व्रत स्वीकारले ?
४)श्यामची आई का प्रदक्षिणा मारू शकत नव्हती ?
५) श्यामने का पहिल्यांदा प्रदक्षिणा मारण्यास नकार दिला?
पालकांना उपक्रमविषयक माहितीपर दोन शब्द..
दर सोमवारी श्यामची आई पुस्तकातील संक्षिप्त गोष्टीचे कथन झाल्यावर दर मंगळवारी त्या गोष्टीवरील सोपे प्रश्न विद्यार्थी बालमित्रांची थोडीशी उजळणी घेणे अपेक्षित आहे. प्रश्न अत्यंत सोपे, कमीत कमी शब्दातील, बाळबोध, मुलांना आनंददायी असेच घेण्याचा प्रयत्न आहे.
—