नवी दिल्ली – फेसबुक इंडियाच्या पब्लिक पॉलिसी हेड अंखी दास यांनी राजीनामा दिला आहे. सोशल मिडीयावर द्वेषयुक्त भाषणावरून अलीकडेच त्यांचे नाव वादात सापडले होते. अखेरीस त्यांनी राजीनामा दिला आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने.याबाबत माहिती दिली आहे.
काही आठवड्यांपूर्वी कंपनी आणि अंतर्गत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर राजकीय हस्तक्षेपामुळे कर्मचार्यांना सरकारच्या प्रश्नांना सामोरे जावे लागले होते. सध्या फेसबुकच्या भारतातील वापरकर्त्यांची संख्या ३० कोटी पर्यंत पोहोचली आहे. दास यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे, जनसेवेमध्ये रुची असल्याने त्यांनी हा निर्णय घेतल्याचे भारताचे फेसबुक प्रबंधक अजित मोहन यांनी सांगितले आहे.
सर्वात जुन्या आणि विश्वासू कर्मचाऱ्यांपैकी त्या एक असून कंपनीच्या यशात त्यांचे मोठे योगदान आहे असेही मोहन म्हणाले. वापरकर्त्यांची खासगी माहिती निवडणुकांसाठी वापरू नये तसेच संबंधित माहिती संकलित करू नये असे निर्देश संसदीय समितीने दिले होते. गेल्यावेळी घडलेल्या प्रकारात, सत्ताधारी नेत्यांच्या घृणास्पद वक्तव्यावरून त्यांना त्रासाला सामोरे जावे लागले होते. अशा परिस्थिती काम न करण्याचा निर्णय घेत दास यांनी राजीनामा दिला आहे.