कोलंबो – श्रीलंकेत महिंदा राजपक्षे यांनी चौथ्यांदा प्रधानमंत्री पदाची शपथ घेतली. कोलंबो जवळील केलनिया महाविहाराय येथे आयोजित कार्यक्रमात त्यांचे लहान बंधू आणि राष्ट्रपती गोताबया राजपक्षे यांनी त्यांना शपथ दिली. उर्वरित खासदारांना पुढील आठवड्यात कॅंडी येथे होणाऱ्या समारंभात शपथ दिली जाणार आहे. महिंदा राजपक्षे यांनी २००६ ते २०१५ या काळात देशाचे राष्ट्रपती म्हणून काम पाहिले असून बुधवारी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये त्यांच्या पक्षाला मोठा विजय मिळाला. राजपक्षे यांना गेल्या नोव्हेंबरच्या अध्यक्षीय निवडणुकीत गोताबाया यांच्या विजयानंतर पंतप्रधान म्हणून नियुक्त करण्यात आले होते. परंतु संसदेत बहुमतापासून ते दूर होते.