नाशिक – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे बुधवारी दोन तासाच्या नाशिक दौ-यावर येणार आहेत. या दौ-यात ते कै. विनायकदादा पाटील यांच्या निवासस्थानी जाणार आहे. सकाळी साडेअकरा वाजता ते आडगाव येथील एमईटी महाविद्यालयाच्या हेलीपॅडवर उतरणार आहे. त्यानंतर ते थेट विनायकदादा यांच्या निवासस्थानी जातील. त्यानंतर साडेबारा वाजता ते एम्रॅाल्ड पार्क येथे जाणार आहे. त्यानंतर ते मुंबईल पुन्हा रवाना होणार आहे. पवार यांचे विनायकदादा यांच्याबरोबर कौटुंबिक व जिव्हाळ्याचे संबध होते.