मुंबई – बिहारच्या नितीश सरकारमध्ये भाजप नेते शाहनवाज हुसैन यांनी उद्योग मंत्री म्हणून शपथ घेतली आहे. ते भारतीय जनता पार्टीचे निष्ठावान नेते आहेत. हुसैन यांच्या राजकारणातील प्रवासाप्रमाणेच त्यांची लव्ह स्टोरी देखील इंटरेस्टींग आहे. फार कमी लोकांना हे माहिती आहे की भारताचे माजी पंतप्रधान स्व. अटल बिहारी वाजपेयी यांच्यामुळे शाहनवाज हुसैन बॉलिवूडमध्ये जाता जाता राहून गेले होते.
व्हॅलेंटाईन विकमध्ये राजकीय पुढाऱ्यांच्या प्रेम कहाण्यांची चर्चा सुरू असताना हुसैन यांची चर्चा होऊ नये तरच नवल. बिहारच्या सुपोल येथील विल्यम्स हायस्कूलमध्ये हुसैन बारावी शिकले. त्यानंतर १९८६मध्ये पुढील शिक्षणासाठी दिल्लीतील पुसा एग्रीकल्चर कॉलेजमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. यादरम्यान ते दररोज डीटीसीच्या बसने कॉलेजला जायते. या प्रवासात त्यांना एक सुंदर तरुणी दिसली आणि त्यांचा तिच्यावर जीव जडला. पहिल्याच नजरेत प्रेम झाल्यामुळे हुसैन यांनी तिला फॉलो करायला सुरुवात केली. एकदा तर बसमध्ये प्रचंड गर्दी असताना त्यांनी आपल्या जागेवर तिला बसवले. हळूहळू गप्पा रंगायला लागल्या आणि ओळख वाढू लागली.
धर्माचे टेंशन










