नाशिक – पावसाळी वातावरणामुळे चाळीत मोठया प्रमाणावर कांदा सडलाय.. थोडा फार शिल्लक आहे तो अजून तसाच ठेवला तर शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होईल…व्यापाऱ्यांची मागणी रास्त असली तरी बेमुदत निलाव बंद ठेवणं सद्य परिस्थितीत योग्य नाही. केंद्र सरकार दोन तोंडी आहे. नुकतेच आणलेल्या कृषी कायद्यात मूल्य साखळीत स्टॉक लिमिट नाही असा नियम आहे. मग आता स्टॉक लिमिट का..?? व्यापारी अडचणीत आणले की त्याचा तोटा शेतकऱ्यांना होतो. भाव पडतात.. म्हणून व्यापाऱ्यांची मागणी योग्य असली तरी त्यांनी मार्केट बंद ठेवण्याची घेतलेली भूमिका चुकीची आहे. शासनाने यात तात्काळ हस्तक्षेप करावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी केली आहे.