नाशिक – विहितगाव मध्ये सकाळी भरवस्ती मध्ये बिबट्याचे दशर्न झाल्याने ग्रामस्थामध्ये भीतीचे वातावरण परसले असून बिबट्या पकडण्यासाठी वन विभागाची शोध मोहिम सुरु आहेत. बिबट्या एका झाडाच्या झुडपात लपून बसला असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.
याबाबात ग्रामस्थानी सांगितले की, सकाळी राणी लक्ष्मीबाई रोड, जहागिरदार वाडा, कैलास किराणा जवळ विघ्नहर मंदिराच्या पत्र्याचा शेडमध्ये बिबट्या महिला सफाई कर्मचारीला दिसला, तीने आरडा ओरड केल्यानंतर तो तेथून निघून मारुती मंदिराच्या मागील बाजुस गुलाब शेख यांच्या बाथरुम मध्ये जावून लपला. तेथे पोलीसांनी काठीच्या सह्याने बाहेर काढत आसतांना तो बाथरुंमची लोखंडी जाळी तोडून तो बाहेर पडला. एका घरावरुन मोठी झेप घेत तो विहीतगाव स्मशानभूमी शेजारी झाडाझुडपात लपला. पोलीस बिबट्याला काठी सह्याने बाहेर काढत असतांना धावपळीत पोलीस जखमी झाले. त्यानंतर सकाळी साडे दहा वाजेत्या सुमारास वनविभागाचे पथक येवून त्यांनी परिसराची पाहणी करुन शोध मोहिम सुरु केली. यावेळी सहायक पोलीस आयुक्त अशोक नकाते, उपनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल रोहकले हे घटना स्थळी आले. नगरसेविका सौ. सत्यभामा गाडेकर, नगरेसवक जगदिश पवार, राष्ट्रवादी काॅग्रेसचे विक्रम कोठूळे, अमर जमधडे आदिनीं शोध मेहिमेत सहकार्य केले
बिबट्यांची माहिती परिसरात मिळतांच बिबट्याला बघण्यासाठी विहितगाव वालदेवी नदी पुलावर नागरिकांनी गर्दी केली होती. दरम्यान सदरचा बिबट्या हा रोकडोबा वाडी परिसरात असलेल्या डोबी मळा भागातून आला असावा, रात्री या बिबट्याने एका कुत्र्यावर हल्ला केल्याचे समजते काल सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास सदर बिबट्याने भर वस्ती असलेल्या विहितगाव मध्ये प्रवेश केला त्यामुळे नागरिकांमध्ये एकच घबराट निर्माण झाली. परिणामी एका घराच्या बाथरूममध्ये सदरचा बिबट्या हा लपलेला असताना पोलीस हवालदार विनोद लखन हे त्या ठिकाणी गेले असता त्यांनी बिबट्याला हटविण्याचा प्रयत्न केला परंतु बिबट्याने त्यांच्या हातावर पंजा मारून जखमी केले. त्यानंतर सदर बिबट्या हा उडी मारून नदीकाठी असलेल्या झाडाझुडपात जाऊन लपला.
आता या ठिकाणी बिबट्या पकडण्यासाठी वनविभागाच्या वतीने पिंजरा लावण्यात आला असून वनविभागाचे काही कर्मचारी सुद्धा नजर ठेवून आहे. दिवसभर बिबट्याचा शोध लागू शकला नाही त्यामुळे बिबट्या रात्री बाहेर येण्याची शक्यता आहे.