नवी दिल्ली – काँग्रेस नेते राहूल गांधी यांनी आता थेट फेसबुकवरही निशाणा साधला आहे. अमेरिकेतील काही वर्तमानपत्रांनी फेसबुकविषयी वृत्त प्रसिद्ध केले आहे. फेसबुक हे निपक्षपातीपणा करीत असल्याचे त्यात म्हटले आहे. हेच वृत्त ट्विट करीत राहूल यांनी भाजप सरकारवर जोरदार तोंडसुख घेतले आहे.
भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भारतात फेसबुक आणि व्हॉट्सअॅपला चालवतात. ते याद्वारे खोटे वृत्त आणि द्वेष पसरवतात. मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी त्याचा वापर करतात. अखेर, अमेरिकी मीडियाने फेसबुकबाबत सत्य समोर आणले.
– राहुल गांधी