मुंबई – राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांना १ मे पासून सुट्या राज्य सराकारने जाहीर केल्या आहे. ही सुट्टी १ मे ते १३ जून दरम्यान राहणार आहे. १४ जूनपासून नवे शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे. राज्यातील शिक्षक संघटनाकडून वारंवार मागणी करण्यात येत होती. या मागणीला सरकारने प्रतिसाद दिला आहे. विदर्भातील तापमान जास्त असल्यामुळे २८ जूनपासून शाळा सुरू होणार आहेत.