मॉस्को – रशियामध्ये सध्या कोरोना लसीची चाचणी थांबविण्यात आली आहे. कारण या लसींना जास्त मागणी आणि डोस उपलब्ध नसल्यामुळे नवीन स्वयंसेवकांमध्ये कोरोना लसीच्या चाचणीवर अचानक बंदी आणली गेली. या संबंधी अभ्यास करणार्या संस्थेच्या प्रतिनिधीने मॉस्कोची महत्वाकांक्षी कोरोना लस योजना थांबविणे हा धक्का असल्याचे सांगितले.
सदर लस तयार करणाऱ्या रिसर्च सेंटरचे प्रमुख अलेक्झांडर गिंटझबर्ग यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, रशियामध्ये कोरोना लस स्पुतनिक व्हीच्या चाचणीचे 85 टक्के लोकांवर कोणतेही दुष्परिणाम दिसले नाहीत. तर लसीचे दुष्परिणाम 15 टक्के लोकांमध्ये दिसून आले. स्पुतनिक व्ही चा तिसरा टप्पा चाचणी सुरु आहे.
पुढील वर्षी रशियन लसीची चाचणी भारतात पूर्ण होणार आहे .भारतात रशियाच्या कोरोनो लसची चाचणी मार्च महिन्यापर्यंत होऊ शकेल.
भारतात रशियन लसीची चाचणी घेत असलेल्या हैदराबादची फार्मा कंपनी डॉ. रेड्डी यांनी म्हटले आहे की, रशियन लसीच्या तिसर्या टप्प्यातील मानवी चाचण्या मार्चपर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. तसेच डॉ. रेड्डी म्हणाले की, स्पुतनिक-व्ही लसच्या मध्यम टप्प्यातील चाचणीसाठी येत्या काही आठवड्यांत नोंदणी सुरू होईल आणि डिसेंबरपर्यंत ही चाचणी संपेल अशी अपेक्षा आहे.
रशियाने आपल्या स्पुतनिक-व्ही लसच्या फेज थ्री चाचणीसाठी भारतातील फार्मा कंपनी डॉ. रेड्डी लॅबसमवेत करार केला आहे. तसेच ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीसीजीआय) या लसीच्या क्लिनिकल चाचणीसाठी परवानगी दिली आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेला (आयसीएमआर) मान्यताही मिळाली आहे. आता देशभरातील 12 सरकारी आणि खासगी संस्थांमध्ये एकाच वेळी लस चाचणी सुरू होईल. त्यात जीएसव्हीएम मेडिकल कॉलेजसह पाच शासकीय आणि सहा खासगी संस्थाचा समावेश आहे.