येवला : येवला तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या अध्यक्षपदी अनिल सोनवणे तर उपाध्यक्षपदी दगडू टर्ले यांची बिनविरोध निवड झाली आहे. संघाचे विद्यमान अध्यक्ष दत्ता आहेर व उपाध्यक्ष संतोष लभडे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक एकनाथ पाटील यांनी काम पाहिले. या प्रसंगी शिक्षक आमदार किशोर दराडे, अॅड. माणिकराव शिंदे, संभाजी पवार, अंबादास बनकर, अरुण काळे, राधाकिसन सोनवणे, दत्ता वैद्य, सचिन कळमकर, शरद लहरे, बाबा डमाळे आदींसह संघाचे संचालक भागुनाथ उशीर, दिनेश आव्हाड, नाना शेळके, राजेंद्र गायकवाड, जनार्दन खिल्लारे, शिवाजी धनगे, त्र्यंबक सोमासे, भास्कर येवले, संतोष लभडे, आशा वैद्य, मीरा पवार, जगन्नाथ बोराडे, सुरेश कदम, रघुनाथ पानसरे, रामदास पवार, भागुजी महाले, रामदास पवार, बाबा जाधव आदी उपस्थित होते.