येवला : तालुक्यातील आंबेगाव येथे आर्थिक अडचण व कर्जबाजारीपणाला कंटाळून मजुराने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. लासलगाव बाजार समितीत मजुरी काम करणाऱ्या लक्ष्मण निवृत्ती राजोळे (वय २२) याने बुधवारी रोजी पहाटेच्या सुमारास आर्थिक अडचण व कर्जबाजारीपणाला कंटाळून घराच्या छताला दोर बांधून गळफास घेत आत्महत्या केली. या बाबत देविदास राजोळे यांनी पोलिसांना खबर दिली. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे.