येवला – विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून येवला तालुक्यातील अंगणगाव येथील जिल्हा परिषद शाळेचे उपक्रमशील शिक्षक गोकूळ वाघ हे ‘शाळा बंद, पण शिक्षण सुरू’ या उपक्रमा अंतर्गत ओट्यावरची शाळा भरवत आहे. त्यांची ही शाळा सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे.
कोरोनामुळे ऑनलाईन शिक्षणाचा उपक्रमही सर्वच शाळांमधून राबविला जात आहे. ग्रामीण भागातही हा प्रयोग केला जात आहे. पण, येथील विद्यार्थ्यांकडे अॅानलाईन शिक्षणासाठी आवश्यक असलेली साधने अनेकांकडे नाही. त्यामुळे अोट्यावरची शाळा अतिशय फायदेशीर ठरत आहेत. हा उपक्रम अतिशय उपयुक्त असून विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी गरजेचा आहे अशी प्रतिक्रिया पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी मनोहर वाघमारे, विस्तार अधिकारी सुनिल मारवाडी यांनी व्यक्त केली आहे.