कराची – सर्जिकल स्ट्राईक झाल्यापासून पाकने अनेकदा भारताच्या हल्ल्याची भीती व्यक्त केली आहे. भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान जेव्हा पाकिस्तान हवाई विमानाचा पाठलाग करत पाकिस्तानला गेला तेव्हा ही भीती देखील दिसून आली. त्यावेळी भारताकडून होणाऱ्या हल्ल्याची भीती व्यक्त केली जात होती आणि या भीतीमुळे अभिनंदनला सोडले, असा दावा पाकिस्तानचे खासदार अयाज सादिक यांनी केला आहे.
पाकिस्तानचे खासदार अयाज सादिक यांनी भारतीय विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्याविषयी खळबळजनक खुलासा केला असून भारताकडून हल्ल्याच्या भीतीने पाकिस्तानने घाईघाईत विंग कमांडर अभिनंदन यांना सोडल्याचे म्हटले आहे. बुधवारी संसदेत हा त्यांनी दावा केला.
गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात पाकिस्तानी हवाई दलाच्या विरुद्ध कारवाई दरम्यान मिग २१ क्रॅश झाल्यानंतर अभिनंदन यांना पाकिस्तानी सुरक्षा दलाने पकडले होते. पंतप्रधान इम्रान खान यांनी स्वत: भारतीय विंग कमांडर अभिनंदन यांना बोलावलेल्या बैठकीला येण्यास नकार दिला होता, तेव्हा पाकिस्तानी लष्करप्रमुख तेथे आले त्यावेळी भारत हल्ला करेल या भीतीने अभिनंदन यांना सोडले असे मत खासदार अयाज सादिक यांनी व्यक्त केले आहे.
अभिनंदन यांना सीमा ओलांडू दिली नाही तर भारत रात्रीच्या वेळी पाकिस्तानवर हल्ला करेल या भीतीपोटी त्यांना सोडण्यात आले असा दावा परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी केला. तसेच कुलभूषण जाधव यांच्यासाठी अध्यादेश आणला नाही, आधीचा अध्यादेश एक-दोन महिने लपवून ठेवण्यात आल्याचे विधान त्यांनी केले. याबाबत इस्लामाबाद उच्च न्यायालयात दाद मागितली असल्याचे त्यांनी सांगितले.