भोपाळ – मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज (१८ ऑगस्ट) मोठी घोषणा केली आहे. सरकारी नोकऱ्यांमध्ये केवळ भूमिपुत्रांनाच संधी देण्यात येणार आहे. यासंदर्भात आवश्यक ती कायदेशीर पावले उचलली जातील, असेही त्यांनी सांगितले आहे. एका व्हिडिओद्वारे चौहान यांनी मध्य प्रदेशच्या नागरिकांना हा सुखद धक्का दिला आहे. भरतीसाठी परराज्यातूनही मोठ्या प्रमाणात अर्ज येतात आणि त्या विद्यार्थ्यांना संधीही मिळते. नुकत्याच एका भरतीत परराज्यातील मोठे अर्ज आल्याने जोरदार विरोध प्रदर्शन झाले होते. त्याची दखल चौहान यांनी घेतली आणि आज ही घोषणा केली आहे.