सोमवार, नोव्हेंबर 17, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

मॅग्नेटीक महाराष्ट्र : ३५ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणूक प्रस्तावांवर स्वाक्षऱ्या

नोव्हेंबर 2, 2020 | 3:49 pm
in मुख्य बातमी
0
NPIC 202011219270

मुंबई –   मॅग्नेटीक महाराष्ट्र दोन अंतर्गत आज एमआयडीसी अर्थात, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि विविध कंपन्यां यांच्यात गुंतवणूकीसाठी सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात आल्या. यामुळे १५ कंपन्यांमार्फत जवळपास ३४ हजार ८५० कोटींची गुंतवणूक राज्यात होत आहे. तसंच यामुळे सुमारे २३ हजार १८२ लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहेत.

मागील सामंजस्य करारातील ६० टक्के उद्योगांच्या बाबतीत सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे ही निश्चितच समाधानाची बाब आहे, असं यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. मित्सुबिशी इलेक्ट्रीक इंडिया, ओरिएंटल ऍरोमॅटिक्स, अदानी एन्टरप्राइजेस आणि एस्सार इंडिया अशा १५ कंपन्यांचा यात समावेश आहे.

राज्यात १ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक आणण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे. गुंतवणूकदार आणि राज्य शासन या दोघांत एकमेकांवर विश्वास असून राज्य या कोरोना परिस्थितीत नुसते बाहेर नाही पडणार तर अधिक सामर्थ्यानं देशात आघाडी घेईल, असंही ते म्हणाले.

  यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, उद्योग राज्य मंत्री आदिती तटकरे, मुख्य सचिव संजय कुमार, प्रधान सचिव उदयोग वेणूगोपाल रेड्डी, एमआयडीसी मुख्य कार्यकारी अधिकारी अनबलगन, एफडीआय शेर्पा प्रधान सचिव भूषण गगराणी उपस्थित होते.

राज्यात एक लाख कोटी रूपयांच्या गुंतवणुकीचे लक्ष पूर्ण करणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज एमआयडीसी आणि विविध कंपन्यांमध्ये सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात आल्या. १५ कंपन्यांमार्फत जवळपास ₹३४,८५० कोटींची गुंतवणूक राज्यात होत आहे. तसेच यामुळे सुमारे २३,१८२ लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, गुंतवणूकदार आणि राज्य शासन यांचा एकमेकांवर विश्वास आहे. मागील सामंजस्य करारातील अनेक प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. सुमारे ६० टक्के उद्योगांच्या बाबतीत जमीन अधिग्रहणासारख्या प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत ही निश्चितच समाधानाची बाब आहे.

कोरोनासारख्या संकट काळातही उद्योग विभागाने उद्योजकांचा विश्वास कायम ठेवला आहे. यासाठी उद्योग खात्याचा अभिमान असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, आज झालेले सामंजस्य करार ही केवळ सुरूवात आहे. सुमारे ३५ हजार कोटींची गुंतवणूक आज होते आहे ही महत्त्वाची गोष्ट आहे. लवकरच एक लाख कोटी पेक्षा जास्त गुंतवणूक राज्यात आणण्याचे उद्दीष्ट आहे. महाराष्ट्र या कोरोना परिस्थितीत नुसते बाहेर नाही पडणार तर अधिक सामर्थ्याने देशात आघाडी घेईल.

युनिटी इन डायव्हर्सिटी असे हे आजचे करार आहेत. केमिकल, डेटा यासह लॉजिस्टिक, मॅनुफॅक्चरिंग अशा विविध क्षेत्रातील उद्योग राज्यात गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत. महाराष्ट्र हा डेटा सेंटरच्या बाबतीतही देशाचे महत्त्वाचे केंद्र बनेल, असा मला विश्वास आहे.

यु के, स्पेन, जपान, सिंगापूर यासारख्या देशांतील जागतिक उद्योजकांनी आज सामंजस्य करार केले असून आजही राज्यास गुंतवणुकीसाठी प्राधान्य दिले जात असल्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले.

श्री. देसाई म्हणाले, डेटा सेंटर, लॉजिस्टिक पार्क, मॅनुफॅक्चर या सर्व क्षेत्रातील गुंतवणूकदारांना आवश्यक असणारे वातावरण राज्यात उपलब्ध आहे. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात राज्य गुंतवणुकीचे लक्ष सहज साध्य करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

यांनी केली गुंतवणूक 

अ.क्र नाव देश क्षेत्र प्रस्तावित
गुंतवणूक
(रु. कोटीमध्ये)
प्रस्तावित
रोजगार
1 मित्सुबिशी इलेक्ट्रिक इंडिया प्रा. लि. जपान इलेक्ट्रॉनिक्स 490 350
2 ब्राईट सिनो होल्डिंग प्रा. लि. भारत इंधन तेल व वायू १,८०० १,५७५
3 ओरिएंटल ऍरोमॅटिक्स भारत रसायने 265 350
4 मालपानी वेअरहाऊसिंग अँड इंडस्ट्रिअल पार्क भारत लॉजिस्टिक्स 950 ८,०००
5 एव्हरमिंट लॉजिस्टिक्स भारत लॉजिस्टिक्स 354 २,१००
6 पारिबा लॉजिस्टिक्स पार्क भारत लॉजिस्टिक्स 381 २,२००
7 ईश्वर लॉजिस्टिक्स पार्क भारत लॉजिस्टिक्स 395 २,२००
8 नेट मॅजिक आयटी सर्व्हिसेस प्रा. लि. भारत डेटा सेंटर १०,५५५ 575
9 अदानी एन्टरप्राइजेस लि. भारत डेटा सेंटर ५,००० १,०००
10 मंत्र डेटा सेंटर स्पेन डेटा सेंटर १,१२५ 80
11 एसटीटी ग्लोबल डेटा सेंटर्स इंडिया प्रा. लि. भारत डेटा सेंटर 825 800
12 कोल्ट (डेटा सेंटर होल्डिंग्स इंडिया एलएलपी) युके डेटा सेंटर ४,४०० 100
13 प्रिन्स्टन डिजिटल ग्रुप सिंगापुर डेटा सेंटर १,५०० 300
14 नेस्क्ट्रा भारत डेटा सेंटर २,५०० २,०००
15 इएसआर इंडिया सिंगापुर लॉजिस्टिक्स ४,३१० १,५५२
एकूण ३४,८५० २३,१८२
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पदवीधर आणि शिक्षक मतदार संघ निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

Next Post

सिन्नर पंचायत समितीच्या माजी उपसभापती विजया सुदाम सांगळे यांचे निधन

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, १४ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 13, 2025
Vishwadharmi Manavta Teertha Rameshwar Rui
महत्त्वाच्या बातम्या

उध्वस्त मंदिर व मशिदीच्या जागी ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन’… उद्या होणार लोकार्पण… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
traffic signal1
महत्त्वाच्या बातम्या

अहिल्यानगर – मनमाड मार्गावरील वाहतुकीबाबत झाला हा महत्वाचा निर्णय…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0024
मुख्य बातमी

कुंभमेळ्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमीपूजन…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0023
महत्त्वाच्या बातम्या

पंचवटीतील रामकाल पथचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमीपूजन… रामकुंडाचा चेहरामोहरा बदलणार…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण… अशी आहेत तिची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
Next Post
IMG 20201102 WA0028

सिन्नर पंचायत समितीच्या माजी उपसभापती विजया सुदाम सांगळे यांचे निधन

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011