मुंबई – राजधानी मुंबईमध्ये शुक्रवारी दिवसभरात १ हजार १५८ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे बरे झालेल्यांची एकूण संख्या ७८ हजार २५९ झाली आहे.
मुंबईत काल १ हजार ५७ नवे कोरोनाबाधित निश्चित झाले असून आतापर्यंतची एकूण संख्या १ लाख ६ हजार ९८० झाली आहे. त्यापैकी २२ हजार ४४३ कोरोनाबाधितांवर सध्या उपचार सुरु आहेत. मुंबईत काल ५४ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने, कोरोना मृतांची एकूण संख्या ५ हजार ९८४ झाली आहे. मुंबईत कालपर्यंत, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७३ टक्के, तर रुग्ण वाढीचं प्रमाण १ पूर्णांक ९ शतांश टक्के होते. मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ६४ दिवस इतका आहे.