मुंबई – राज्याचे माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे निधन झालेे. निलंगेकर हे १९८५ ते ८६ या दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री होते.त्यांनी राज्याच्या मंत्रिमंडळात त्या आधी अनेक महत्त्वाच्या खात्यांचा कारभार सांभाळला होता. शिवाजीराव निलंगेकर यांचे राजकीय जीवन संघर्षमय राहिले आहे. अनेक कठीण प्रसंगांना तोंड देत त्यांनी यावर यशस्वीपणे मातही केली. अतिशय शिस्तप्रिय म्हणून त्यांची महाराष्ट्राला ओळख होती. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातही त्यांचा सहभाग होता.त्यांच्या निधनाने निलंगेकर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून राज्याचे एक संघर्षशील व्यक्तीमत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.