नाशिक – अन्न व औषध प्रशासनकडून सिडकोतील एका महिला फार्मासिस्टला महिनाभर उलटूनही परवाणगी न मिळाल्यामुळे त्यांनी थेट मुख्यमंत्र्याकडे लेखी तक्रार केली आहे. दरम्यान अन्न अौषध प्रशासनाने महानगरपालिकेने प्रस्ताव नामंजूर केल्यामुळे आम्ही मेडिकल परवानाचा प्रस्ताव रद्द केल्याचे सांगितले.
महिनाभरापूर्वी क्रांती कोठावदे या महिला फार्मासिस्टने नाशिकच्या एफडीए कार्यालयात शिवशक्ती मेडिकल अँण्ड जनरल स्टोअर्स नावाने मेडिकल स्टोअर टाकण्यासाठी अर्ज केला होता. या अर्जासोबत व्यावसायिक वापराबाबतचा जागा असल्याचा पुरावा म्हणून महानगरपालिकेची व्यावसायिक जागेसाठी कर भरल्याची पावती, व्यावसायिक लाईट बिल सादर केले होते. सर्व कागदपत्रांची पूर्तता असताना देखील माझा अर्ज नाकारला गेला अशी तक्रार कोठावदे यांची आहे.
अगोदरच अर्ज रद्द
एफडीए अधिकाऱ्यांनी महानगरपालिका अहवाल येण्यागोदरच रद्द केला. महानगर पालिका अभिप्राय हा ३० तारखेला आला, अर्ज मात्र २७ तारखेलाच रद्द केला गेला असल्याचे क्रांती कोठावदे यांचे म्हणणे आहे.