नाशिक – अभिनेत्री कंगणा राणावत, मर्चंट नेव्हीतील निवृत्त अधिकारी मदन शर्मा यांनी महाराष्ट्र विरोधात केलेल्या वक्तव्यांनी महाराष्ट्राची बदनामी करण्याचे षडयंत्र चालवले जात असल्याने राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे पोस्ट शेअर करण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसांपासून अमरावती लोकसभेच्या खासदार नवनीत राणा या कंगणा राणावत आणि मदन शर्मा यांच्यावर अन्यायकारक वागणूक महाराष्ट्र सरकारला देत आहे. महाराष्ट्रात अनेक प्रश्न ज्वलंत असतांना नाहक वेगळा विषय काढून वाद पेटवण्याचे प्रयत्न केले जात असल्याने सोशल मीडियावर पोस्टच्या माध्यमातून निषेध व्यक्त करण्यात आला आहे. भारतीय राज्य घटनेनुसार देशातील प्रत्येक व्यक्तीला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे परंतु त्याचा गैरवापर नको अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे घेण्यात आली आहे. महाराष्ट्रात कोरोना रोगाने थैमान असतांना केंद्राची सापत्न भूमिका असून देखील राज्य सरकार चांगल्या पद्धतीने काम करत असल्याचे मत शहराध्यक्ष अनिता भामरे यांनी व्यक्त केले आहे. नवनीत राणा यांच्या वक्तव्यांविरोधी फेसबुक व अन्य सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून निषेध व्यक्त केला आहे.