मुंबई – प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक व लेखक निशिकांत कामत याचे दीर्घ आजाराने उपचारादरम्यान निधन झाले आहे. नाटक, अभिनय आणि दिग्दर्शक क्षेत्रात त्यांनी आपल्या कामाचा अमिट ठसा उमटविला होता. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘डोंबिवली फास्ट’ या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमाचा पुरस्कार देखील मिळाला आहे. मराठी सोबतच हिंदी चित्रपट सृष्टीतही त्यांनी आपला दबदबा निर्माण केला. त्यांच्या निधनाने एक उत्कृष्ट मराठी सिनेदिग्दर्शक कायमचा काळाच्या पडद्याआड गेला आहे. मुख्यमंत्र्यांसह अनेक मान्यवरांनी त्यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली व्यक्त केली आहे.