मनमाड – डीसीएचसी सेंटर सुरू करण्यात यावे या मागणी साठी मनमाड नगर परिषदच्या गेटवर वंचित बहुजन आघाडी तर्फे बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. शहरात जवळपास १८ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. अजून किती बळी गेल्यावर सरकार आमची दखल घेईल असा सवाल उपस्थित करत वंचित बहुजन आघाडीने बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. वंचितचे नेते माजी नगराध्यक्ष राजेंद्र पगारे यांनी आरोग्य विभाग मनमाडच्या जनतेच्या जीवाशी खेळत आहे. कोव्हिड सेंटरला जागा उपलब्ध होत नसल्याचे ते सांगत आहे. ही जागा जेव्हा मिळेल तेव्हा मिळेल. पण, अगोदर आम्हाला रेल्वेच्या आयसोलेशन कोच उपलब्ध करून द्याव्या अशी मागणी त्यांनी केली. या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सामील झाले.