नाशिक – महसूलमंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नाशिक काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत सोशल डिस्टन्सिंगला तिलांजली देण्यात आल्याचे पहायला मिळाले. यासंदर्भात थोरात यांनीही कबुली दिली.
नाशिक शहरासह जिल्ह्यातील काँग्रेस पक्ष कार्याचा आढावा घेण्यासाठी थोरात रविवारी (१५ ऑगस्ट) नाशिक दौऱ्यावर होते. तुपसाखरे लॉन्स येथे त्यांनी दोन बैठका घेतल्या. मात्र, बैठकीला मोठी गर्दी झाली. त्यामुळे कोरोनाच्या काळातील सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळला गेला नाही.
मराठा आंदोलनासह विविध प्रकारचे डाव भाजप आखत आहे. पण, त्यात ते यशस्वी होणार नाहीत, असे थोरात म्हणाले. दरम्यान, पार्थ पवार आणि आदित्य ठाकरे यांच्याबद्दल काहीही बोलण्यास त्यांनी नकार दिला.