भगूर – राष्ट्रवादी महिला काँग्रेस व झेप भरारी फाऊंडेशनच्या तर्फे भगूर शहरात युवक युवतींसाठी “Job Fair – 2020” नोकरी मेळाव्याचे आयोजन राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाधक्ष व झेप फाऊंडेशनच्या संस्थापक आध्यक्षा प्रेरणा बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. या मेळाव्यासाठी सुमारे ६०० हून अधीक युवक युवतींनी सहभाग नोंदवला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊनमुळे परप्रांतीय कामगारांचे इतर राज्यात स्थलांतर झाले आहे. त्यामुळे अौद्योगिक कंपन्यांना मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची कमतरता भासत आहे. या पार्श्वभूमीवर पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर येथील नामांकीत अस्थापना कंपन्यांमध्ये विविध प्रकारच्या रिक्तपदांसाठी मोठी संधी असल्यामुळे या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे यांनी सांगितले की, तरुणांसाठी आज घडीला नोकरी मिळवणे हे खूप कठीण काम वाटते. योग्य माहितीची कमतरता, अधिक माहिती, नेमका इंटरेस्ट कशात याविषयी माहिती नसणे, करिअरविषयीचे अनेक समज-गैरसमज आणि करिअरविषयी मनात असलेला गोंधळ नेमका का, या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्नात ते गोंधळून जातात..पण या सर्व गोष्टींना वाचा देत तुम्ही प्रयत्न करा नोकरी आम्ही मिळवून देऊ यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या मेळाव्यात तत्व टेक्नाॅलॅाजीस (ठाणे), आरयन हाॅस्पीटॅलिटी, पाटले एड्यू स्कील्स फाऊंडेशन( नागपूर), ॲक्युरा वाॅलव्ह, भंडारी ग्लोबल सरव्हीसेस, अजमेरा इंडस्ट्रीज, एमपी असोसीएट्स, स्वराली काॅन्ट्रेक्ट्स या कंपनींसह काही कंपन्यांचे virtual मुलाखाती देखील या ठिकाणी घेण्यात आल्याची माहिती झेप फाऊंडेशनचे सेक्रटरी विशाल बलकवडे यांनी दिली. आज जागेवर ४० लोकांची नेमणुक करण्यात आली असून पुढील दोन दिवसात नेमणुकीचा दुसरा टप्पा पार पडणार आहे व त्यात देखील असंख्य तरुणांना नोकरीची संधी मिळेल अशी माहिती त्यांनी दिली. आरयन हॉस्पीटॅलिटीचे रसल मॅथीव व पाटले एड्यू स्कील्सचे रंजीत पांडे यांनी तरुणांना ऑडियो कॉन्फरन्स द्वारे मार्गदर्शन केले.
या वेळी राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे, विशाल बलकवडे, आमोल हरळे, गोरखनाथ बलकवडे, चिंतन अजमेरा, गणेश गायधनी, पंकज शेलार, सतीश भंडारी, दर्शन अनारे, सचीन गुळवे, सुरज वंदार, आदिंसह असंख्य युवक युवती उपस्थित होते.